
श्रीगोंदा तालुक्यातील मौजे भानगाव येथे एका विहिरीत पुरुष जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले. विहिरीत टाकण्यापूर्वी’ या अर्भकाचा मृत्यू झाला होता की विहिरीत टाकल्यानंतर मृत्यू झाला याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर समोर येणार आहे.
भानगाव येथे गट क्रमांक 359 मध्ये पोपट टकले यांच्या मालकीची विहीर आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास टकले हे विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या विहीरीत पुरुष जातीचे अर्भक पाण्यावर तरंगताना आढळून आले.
याबाबत त्यांनी तातडीने श्रीगोंदे पोलिसांना माहिती दिली. तात्काळ श्रीगोंदे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.व हे मृत नवजात अर्भक ताब्यात घेतले आहे. रोहित टकले यांच्या तक्रारीनंतर रात्री उशिरा श्रीगोंदा पोलिसांत अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे मृत अर्भक कोणाचे आहे,कुणी विहिरीत टाकले याबाबत पोलीस तपास करत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून पोलीस हवालदार आर. बी. झुंजार,योगेश भापकर हे करत आहेत.































































