राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्षपदी श्रीकांत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर प्रभारी अध्यक्षपदी श्रीकांत पाटील यांची नेमणूक केली आहे. तर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडे पुणे शहर निवडणूक समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकराची चर्चा सुरू असतानाच पाटील यांची निवड काही काळासाठी ठरणार का हे पाहणे जरूरीचे ठरणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्यालयात पदभार स्वीकारला.