श्रीरामपुरातील नरभक्षक बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला

गेल्या तीन महिन्यांपासून दबा धरून नागरिकांवर जीवघेणा हल्ला करणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे. त्यामुळे बेलापूर खुर्द परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

बेलापूर खुर्द परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून या बिबटय़ाने दहशत निर्माण केली होती. शेतकरी कुटुंबातील नीरज प्रमोद पुजारी, आशिष पुजारी, शांताबाई जाधव, संजय लोखंडे यांच्यावर या बिबटय़ाने जीवघेणा हल्ला केला होता. तसेच अनेक शेळ्यांसह पाळीव प्राण्यांचा फडशाही पाडला होता. त्यामुळे या भागात बिबटय़ाची दहशत पसरली होती. वन विभागाला विनंती करून या भागात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार अजित देशमुख यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. रविवारी पहाटे बिबट्या या पिंजऱ्यात अडकला. बिबट्याच्या डरकाळ्या ऐकून ग्रामस्थांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली असता, बिबटय़ा पिंजऱ्यात अडकल्याचे दिसून आले. बेलापूर खुर्दचे उपसरपंच ऍड. दीपक बारहाते, माजी उपसरपंच प्रा. अशोक बडधे, द्वारकानाथ बडधे, ग्रामपंचायत सदस्या प्रणाली भगत, राहुल भगत, सदस्य दिलीप भगत, विनय भगत, प्रल्हाद पुजारी, नीरज पुजारी, सत्यजित देशमुख, धनंजय पुजारी, डॉ. रवींद्र महाडिक, माजी सरपंच सुनील क्षीरसागर, बाळू पुजारी, अमोल पुजारी, मनोज पुजारी, रमेश पुजारी, सुरेश भगत, सुरेश पुजारी, रमेश भगत, मनोज पुजारी, माजी उपसरपंच शरद पुजारी, शशिकांत पुजारी, गणेश पुजारी यांनी बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या