
अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. यासंदर्भात शुभांगी गोखलेंनी स्वतः माहिती दिली आहे, ‘‘पुन्हा एकदा माझे अकाऊंट हॅक झाले आहे. माझ्या नकळत सर्वांना मेसेजमध्ये एक लिंक जात आहे. कृपया ती लिंक ओपन करू नका. माझे सायबर सेलसोबत बोलणे सुरू आहे’’.
शुभांगी गोखलेंनी पुढे लिहिलंय, हा मेसेज गेले अनेक दिवस फेसबुक मेसेंजरवर फिरतोय. कृपया कोणी तुम्हाला ही लिंक पाठवली तर ओपन करू नका. ओपन केलीत तर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना मेसेज जातील. ही एक व्हायरल लिंक आहे. तुम्ही जर क्लिक केलंत तर ही लिंक तुम्हाला फेक यूटय़ूबसारख्या दिसणाऱया साईटवर घेऊन जाते. जिथे मेसेंजरसारखचं पेज दिसतं. तिथे लॉगइन केल्याशिवाय व्हिडीओ दिसणार नाही, असं सांगितलं जातं. हा ट्रप आहे, यात अडकू नका.


























































