
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करीत सोमवारी या केंद्रशासित प्रदेशामध्ये शटडाऊन अर्थात पूर्णपणे बंद पाळण्यात आला. संपूर्ण दिवसभर सर्व प्रकारची दुकाने, व्यवसाय बंद ठेवल्यामुळे लडाखच्या रस्त्यांवर सन्नाटा पसरला होता. बंदला सर्व संघटनांनी पाठिंबा दिला तसेच लेह आणि कारगील जिल्ह्यांत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

























































