रामसेंवर अजय देवगण बनवणार बायोपिक

767

‘पुरानी हवेली’, ‘दो गज जमीन के नीचे’, ‘वीराना’, ‘बंद दरवाजा’ असे सातत्यपूर्ण भयपट बनविणाऱ्या रामसे बंधूंच्या जीवनावर आता बायोपिक बनणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता अजय देवगण हाच निर्मात्या प्रीती सिन्हा यांच्या साथीने या बायोपिकची निर्मिती करणार आहे. ‘दी रामसे बायोपिक’ असे नाव असलेल्या या जीवनपटाचे लेखन रितेश शाह करणार असून अजय देवगणने नुकतेच या बायोपिक निर्मितीचे हक्क विकत घेतले आहेत. 1970 ते 1980 हा कालखंड रामसेंच्या थरारक भयपटांसाठी सुवर्णकाळ होता. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळत असले तरी या सिनेमांचा एक खास प्रेक्षकवर्ग होता. त्यामुळे हे चित्रपट देणाऱ्या रामसे बंधूंची कहाणी पाहायला या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, हो ना…!

आपली प्रतिक्रिया द्या