
बॉलीवूडमधले मोस्ट फेव्हरेट कपल अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या घरी लहान बाळाचे आगमन झाले आहे. मंगळवारी मंगळवारी कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. लग्नाच्या अडीच वर्षांनी यांच्याकडे पाळणा हलल्य़ामुळे त्यांच्या घरी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. ही आनंदाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी या जोडप्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
दोन वर्षांपूर्वी 7 फेब्रुवारी 2023 रोजी या दोघांचे लग्न राजस्थानमधील जैसलरमेर येथे मोठय़ा धुमधडाक्यात पार पडले होते. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर 28 फेब्रुवारी, 2025 रोजी गरोदर असल्याचे सांगत कियाराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये बाळाचे मोजे दोघांनीही हातात धरले होते. त्यामुळे सिद्धार्थ आणि कियारासोबत चाहत्यांना देखील या क्षणाची उत्सुकता होती.
कुणी तरी येणार गं! सिद्धार्थ-कियाराच्या घरी गुड न्यूज, खास फोटो शेअर करत दिली माहिती