Signal अॅपमध्ये लवकरच दिसणार WhatsApp सारखे ‘हे’ फीचर्स

Signal अॅप नविन असल्याने यात अजूनही WhatsApp सारखे अनेक फीचर्स उपलब्ध नाही. असे असले तरी जगभरात Signal अॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या दिवसानुदिवस वाढत आहेत. मात्र आता Signal अॅप लवकरच अपडेट होणार असून यात आपल्याला WhatsApp मध्ये असलेले काही फीचर्स पाहायला मिळणार आहेत. चला तर जाणून घेऊ कोणते आहेत हे फीचर्स.

अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स

अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स अत्यंत मनोरंजक असतात. यात WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना स्वतःचे अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स बनवण्याची सुविधा ही देतो. आता हेच फीचर लवकरच आपल्याला Signal अॅपमध्येही पाहायला मिळणार आहे.

ग्रुप कॉल

WhatsApp बीटामध्ये 8 लोकांसोबत ग्रुप कॉल करता येतो. Signal नेही आता ही संख्या 5 वरून आता 8 केली आहे. मात्र असे असेल तरी कॉलसाठी लो डेटा मोडचे फीचर अद्याप फक्त WhatsApp मध्येच आहे. हे फीचर लवकरच Signal मध्येही उपलब्ध होणार आहे.

कंटेट सजेशन

WhatsApp मध्ये कंटेट सजेशनचे फीचर उपलब्ध आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना सहज चॅट करता येते. लवकरच हे फीचर आपल्याला Signal मध्येही पाहायला मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या