‘मरे’ पुन्हा रडे, दिवा-मुंब्रा दरम्यान सिग्नल यंत्रणा बिघडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दिवा-मुंब्र्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक शुक्रवारी सकाळी विस्कळीत झाली. यामुळे पारसिक बोगद्याच्या जवळ एका मागोमाग एक अशी पाच सहा गाड्यांची रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या दिशेने होणारी गाड्यांची वाहतूक तब्बल 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला पुन्हा फटका बसला आहे.