सततच्या पावसामुळे सिक्कीममधील तिस्ता नदीला महापूर आला आहे. नदीकिनारी अनेक भागात पाणी साचले असून भूस्खलन आणि पुरामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. या पुरात सुमारे दीड हजाराहून अधिक पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे कलिम्पोंग -दार्जिलिंग मार्ग बंद करण्यात आला असून उत्तर सिक्किम भागात झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत तर अनेकजण बेपत्ता आहेत. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे दार्जिलिंग आणि कलिम्पोंगचा संपर्क तुटला आहे. मंगल जिह्यात झालेल्या भूस्खलनात सहाजणांचे बळी गेले असून दीड हजाराहून अधिक पर्यटक या भागात अडकले आहेत. मंगन जिह्यातील द्ज़ोंगू, चुंगथांग, लाचेन आणि लाचुंग ही शहरे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र या शहरांचा संपर्क तुटला आहे.