शिरूरकासार तालुक्यातील सिंदफणा प्रकल्प ओव्हरफ्लो

535

बीड जिल्ह्यातील शिरूरकासार तालुक्यातील सिंदफणा मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून ओव्हरफ्लो होत आहे. तसेच लवकरच सांडव्यावरून पाणी खली वाहणार आहे. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. तसेच बळीराजाच्या शेतीसाठीही प्रकल्प वरदान आहे.

सिंदफणा मध्यम प्रकल्पाच्या सिंदफणासह वडाळी, सवसवाडी, गोमळवाडा, पिंपळनेर, रूपूर, कोळवाडी, शिरूरसह अनेक गावांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. तसेच हजारो हेक्टर जमिनीवरील पिके या पाण्याच्या ओलिताखाली येतात. एकदा हा प्रकल्प भरल्यानंतर वर्षभर परिसरातील गावांना याचा फायदा होतो. जवळपास पाच ते सहा वर्षानंतर हा प्रकल्प पूर्ण भरला आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्याच्या अंतिम आठवड्यात पहिल्यांदाच हा प्रकल्प भरला आहे. सध्या परिसरात कपाशीसह इतर पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असल्याचे दिसत आहे. सिंदफणा परिसरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुगाचा पेरा करण्यात आला आहे. रूपूर परिसरात असलेल्या मुगाच्या पिकाला अतिरिक्त पावसाचा फटका बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या