
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वर्षभर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी संशयीत सौरभ बाबूराव बर्जे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सौरभ बर्डे याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर जानेवारी 2024 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत विद्यानगर, आशिये, मुरेडोंगरी याठिकाणी असलेल्या फ्लॅटवर तिला नेत सौरभने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने सौरभ याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे सोमवारी पोलीस ठाण्यात सौरभ याच्याविरोधात पीडितेने फिर्याद दिली. या प्रकरणी सौरभ याच्याविरोधात भारतीय दंड सहितेनुसार 69 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे व अन्य पोलिसांच्या पथकाने सौरभ याला अटक केली. सौरभ याला मंगळवारी (11 फेब्रुवारी 2025) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास राजकुमार मुंढे करीत आहेत.