शीव उड्डाणपूल दुरुस्तीसाठी गुरुवारपासून 5 दिवस बंद

693

शीव उड्डाणपुलाचा दुरुस्तीचा दुसरा टप्पा गुरुवार, 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दुरुस्तीदरम्यान, पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम गुरुवार संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते सोमवार, 2 मार्चच्या सकाळी 7 वाजेपर्यंत केले जाणार आहे. या काळात पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शीव उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी एकूण 8 ट्रफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यातील पहिला ट्रफिक ब्लॉक 14 फेब्रुवारीला पहाटे 5 वाजता सुरू होऊन 18 फेब्रुवारीला पहाटे 5 वाजता संपला. पहिल्या ट्रफिक ब्लॉकमध्ये पुलाचे 32 बेअरिंग बदलण्यात आले आहेत. या दुरुस्तीची नोंद वाहनचालक आणि प्रवाशांनी घ्यावी आणि त्यानुसार सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या