बांधकामाच्या प्रदूषणामुळे शीवमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, शिवसेना-मनसेने घेतली पालिका सहाय्यक आयुक्तांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीव प्रभाग क्र. 173 येथे विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात शिवसेना-मनसेच्या पदाधिकाऱयांनी एफ उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. आरएमएसी चालवणाऱया ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी तसेच नियमानुसार प्रदूषणदर्शक बोर्ड लावण्यात यावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

शीवमधील वाढते प्रदूषण तसेच विविध नागरी समस्यांसंदर्भात शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱयांनी मुंबई महापालिका माटुंगा एफ उत्तरचे सहाय्यक आयुक्त अरुण शिरसागर यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत फेरीफेरी नाल्याची साफसफाई, विभागात जेथे अपघाताची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी रस्त्यावर गतिरोधक लावणे, काही इमारतींना होणारा अपुरा पाणीपुरवठा दूर करावा, तांडेल कान्होजी आंग्रे उद्यानातील शौचालय दुरुस्ती करावी, पंचशील नगरवरील धोकादायक फूट ब्रीज लवकर सुरू करण्यात यावा, रखडलेल्या ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करण्यात यावे अशा विविध समस्या मांडण्यात आल्या. यातील बहुतेक मागण्यांना सहाय्यक आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या बैठकीला शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य सचिव विशाल आमकर, मनसे विभाग सचिव अविनाश किरवे, शाखाध्यक्ष लवू नर, उपशाखाप्रमुख गणेश शिंदे, राजू आंबेरकर, शाखा सहसचिव सुनील खांडे, युवा शाखा अधिकारी किंजल कोळी यांच्यासह शिवसेना-मनसे पदाधिकारी उपस्थित होते.