
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ”अशोक खरात हा पीडितांना मृत्यूची भीती दाखवायचा. त्यांच्या कुटुंबियांचा मृत्यू होईल असे सांगून तो त्यांच्यावर लैंगिक शोषण करायचा व पैसेही उकळायचा”, असे तेजस्विनी सातपुते यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
अशोक खरात विरोधात अहिल्यानगर व नाशिकमध्ये ११ गुन्हे दाखल आहेत. यातील 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे आहेत तर एक गुन्हा हा फसवणूकीचा आहे. अशोक खरात हा महिलांना खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधीचे सामान देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. तसेच स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचेही तो लोकांना भासवायचा. पीडित महिलांना तो त्यांच्या व कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करायचा. त्यानंतर बदनामीा करण्याची धमकीही द्यायचा”, असे सातपुते यांनी सांगितले.
शोक खरातची ईडी चौकशीही होणार
अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांपासून ते महिलांवरील अत्याचारांपर्यंत सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असून दोषींना कडक शिक्षा दिली जाईल तसेच आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

























































