
‘सितारे जमीन पर’ चित्रपटगृहांमध्ये मिळालेल्या प्रचंड यशानंतर, आमिर खानने नुकतीच एक घोषणा केली आहे. येत्या 1 ऑगस्टला त्याचा हा चित्रपट यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात प्रदर्शित होईल. या चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया देशमुख ही प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये विशेष मुलांचा (Special Child) सहभाग हा प्रामुख्याने असल्याने, हा चित्रपट सर्वांच्याच पसंतीस पडला. दिसली आहे. यूट्यूबवर हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला फक्त 100 रुपये मोजावे लागणार आहेत.
आमिर खानने नुकताच त्याच्या सुपरहिट चित्रपट ‘सितारे जमीन पर’ च्या डिजिटल पदार्पणाची घोषणा केली. या दरम्यान, त्याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अहान-अनित यांच्या ‘सैयारा’ चित्रपटाच्या यशाबद्दल देखील भाष्य केले.
अहान पांडे आणि अनित पद्ढा यांचा ‘सैयारा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. त्याच्या यशाने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. हा चित्रपट इतका यशस्वी होईल असे कोणालाही वाटले नव्हते. दरम्यान, आमिर खानने बॉक्स ऑफिसवर ‘सैयारा’च्या यशाबद्दल सांगितले. तो म्हणाला की हे आश्चर्यकारक नाही. त्याने चित्रपटाच्या लोकप्रियतेचे कारण देखील सांगितले. तो म्हणाला, ‘मला वाटते की प्रत्येक पिढी तिच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंटकडे आकर्षित होते. ते कोणत्या प्रकारच्या कंटेंटवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, तरुण प्रेक्षक ‘सैयारा’ला खूप पसंत करत आहेत, जो एक मोठा हिट चित्रपट आहे. प्रत्येक गटाची एक आवड असते. एक सर्जनशील व्यक्ती म्हणून, मला प्रत्येक प्रकारचा चित्रपट बनवायचा आहे.’
आमिर खान आणि जेनेलिया डिसूझा यांच्या ‘सितारे जमीन पर’ ने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई करून प्रेक्षक आणि समीक्षकांची मने जिंकली. आता हा चित्रपट थिएटरनंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर एका नवीन शैलीत प्रदर्शित होणार आहे.