इम्रान खान नंतरही बदल नाही, पाक सैन्याची आक्रमकता वाढली : बीसएफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान सरकार सर्जिकल स्ट्राईकचा दुसरे वर्ष साजरे करत आहेत. याप्रसंगी पाकड्यांच्या कारवायांबाबत बीएसफचे डीजी के.के शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वार्ताहर परिषदेत शर्मा म्हणाले की, “इम्रान खान सत्तेवर येऊनही काही फरक पडला नाही, ऊलट पाकिस्तानी सैन्यात अजून आक्रमकता वाढली आहे.”

शर्मा म्हणाले की, “पाकिस्तानचे नवे सरकार आले तरी सीमेवर त्याचा काहीच फरक पडला नाही. ऊलट आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि एलओसीवर पाकिस्तानी सैन्य अधिक आक्रमक झाले आहे.” तसेच सीमेवर पाकिस्तान सैन्याने दहशतवाद्यांना लाँच पॅड दिले आहेत. जेणेकरून हिंदुस्थानवर हल्ला करण्यास सोपे जाईल. हे लाँच पॅड हिंदुस्थान सीमेपासून फक्त पाच ते सात किमी दूर असतात. इथे आताही दहशतवादी असणार असा दावाही त्यांनी यावेळी केला. दहशतवादाला खत पाणी घालणे हे पाकिस्तानचे धोरण आहेत, आताचे सरकार जियाऊल हक यांचेच धोरण पुढे चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तान बीएसफच्या कारवाईच्या दहशतीखाली आहे. जर ही कारवाई झाली तर पाकिस्तानला मोठे नुकसान होईल याची जाणीव त्यांना असल्याचे शर्मा यांनी सांगितले. तसेच जेव्हा जेव्हा पाकिस्तानने हल्ला केला आहे तेव्हा तेव्हा बीएसफने जशास तसे उत्तर दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.