पाकिस्तानात हल्ल्यात कॅप्टनसह सहा सैनिक ठार

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात एक कॅप्टनसह सहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. हा हल्ला अफगाणिस्तान सीमेलगत कुर्रम जिह्याजवळील सुल्तानी येथे करण्यात आला. दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैनिकाच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. तसेच आयईडी स्फोट घडवून आणला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेऊन कारवाई केली. यात सात दहशतवादी मारले गेले.