सप्तशृंग गड घाटात इनोव्हा दरीत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू

सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची इनोव्हा कार एक हजार फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात सहा भाविक ठार झाले आहेत.

पिंपळगाव बसवंत येथील सात भाविक रविवारी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन घाटातून नांदुरीकडे येत होते. रतनगड परिसरात धबधबा पॉइंटवर इनोव्हा कार दरीत कोसळली. कारमधील लहान मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. दरम्यान, अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.