
सामना ऑनलाईन । मंबई
मुंबईतल्या ताडदेव पोलीस लाईनमधील एका घरात स्लॅब कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. ताडदेव पोलिस लाईनमधील बिल्डींग नंबर चार मध्ये देवगुडे कुटुंबिय राहत असलेल्या 2 नंबरच्या खोलीचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅबचा काही भाग अंगावर पडल्याने रंजना देवगुडे आणि शंकर देवगुडे हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.





























































