छोठ्या हत्तीची घसरगुंडी पाहून नेटकऱयांना आले हसू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर अनेक व्हिडियो व्हायरल होत असतात. त्यातले काही गंमतीदार व्हिडिओ आपल्याला वारंवार पाहावेसे वाटतात. असाच एका छोठ्या हत्तीचा व्हिडियो सध्या नेटिझन्सच्या चेहऱयावर हसू फुलवण्याचे काम करतोय.


अवघ्या 10 सेकंदाच्या व्हिडियोत छोटा हत्ती लहान मुलांप्रमाणे घसरगुंडीचा पुरेपूर आनंद घेताना दिसतोय. चिखलावरची त्याची ही घसरगुंडी पाहून सगळ्यांच्या चेहऱयावर आपोआप हसू उमलते. वन अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 80 हजारांहून अधिक रिट्विट आणि 695 लाईक्स मिळाले आहेत.