
>>प्रसाद सांडभोर
मालाकडे एक पुस्तक होतं. तिला ते फार आवडायचं. इतपं की ती ते दररोज वाचायची. एकदा दोनदा नव्हे तर तीन वेळा – शाळेतून आल्यावर, खेळून झाल्यावर आणि झोपायच्या आधी. सुट्टीच्या दिवशी ती जिथे जाईल तिथे पुस्तक सोबत न्यायची. पुस्तकात एकच गोष्ट होती पण गोष्टीबरोबर, प्रत्येक पानावर अनेक चित्रं होती. माला त्या चित्रांमध्ये हरवून जायची.
“माला…’’ अशी जोरदार हाक मारूनही जर काही उत्तर आलं नाही तर आईला कळायचं की बाईसाहेब पुस्तकात गुंग झाल्या आहेत. मालाचे दा तिला पुस्तकातली गोष्ट मोठय़ानं वाचायला सुचवायचे, आम्हालाही मराठी वाचायला शिकव म्हणायचे. पण तिला मनातल्या मनातच गोष्ट वाचायला आवडायची. सुमनदीदी तिला चिडवत म्हणायची, “ढक्कन माला, एक बार में कछु समझ नहीं आउत इहों, इसलिए बार बार एक ही किताब पढ़े जा रही है’’ पण माला दीदीवर चिडत नसे कारण ती कायम पुस्तक वाचण्यात मग्न असे.
मालाला पुस्तक वाचायला कुठलीही जागा चालायची – गुंडाळलेला बिछाना, स्वयंपाकघरातली खिडकी, रस्त्यावरच्या पिंपळाचा पार; इतपंच नाही तर दुकानातला तेलाचा डबा, गुळाची ढेप, गव्हाच्या – तांदळाच्या गोण्या असं कुठेही बसून ती पुस्तकातल्या गोष्टीत गढून जायची. हो – सांगायचं राहिलं, मालाच्या आईवडिलांचं किराणामालाचं दुकान होतं. दुकानात येणारी गिऱहाइपं तिच्या पुस्तकवेडाचं काwतुक करायची. मालाला मात्र त्याच्याशी काही घेणंदेणं नसायचं. कारण तिचं सगळं लक्ष तर पुस्तकातल्या गोष्टीत आणि गोष्टीतल्या चित्रांत
असायचं ना!
तर एका रविवारी कसं कोण जाणे पण मालाचं आवडतं, एकुलतं एक पुस्तक हरवलं. सगळीकडे शोधलं तरी तिला ते कुठेच सापडेना. मदत मागावी तर आई आणि दा आठवडी बाजाराला गेले होते. सुमनदीदी दुकानात बसली होती. तिच्यासमोरची ग्रिहाइकांची गर्दी लवकर कमी होईल असं दिसत नव्हतं. मालाला एक कल्पना सुचली. तिनं तिच्या कप्प्यातून वही-पेन काढलं आणि ती लिहू लागली –
चित्रांच्या गोष्टीचं एक पुस्तक होतं. ते दांनी मालासाठी आणलं होतं. माला पुस्तकातली गोष्ट वाचायची अन पुस्तकाला तिच्या गोष्टी सांगायची – शाळेत कुणी किती दंगा केला, खेळताना कोण पडलं – कोण रडलं, दुकानात कोण येऊन गेलं, वगैरे वगैरे. पुस्तक भलतं मनमिळाऊ होतं. तिच्या सगळ्या गोष्टी कान देऊन ऐकायचं.
ती पुस्तकाला फिरायला घेऊन जायची. खिडकीतून लिंबावर बसणाऱया मैना दाखवायची. कट्टय़ावर लोळत पिंपळाचा सळसळ आवाज ऐकवायची. बारदानाच्या किल्ल्यावर चढून खाली दुकान कसं दिसतं ते दाखवायची. एकदा ती पुस्तक वाचता वाचता झोपली. उठून पाहते तर पुस्तकाचं मधलं पान फाटलेलं. तिला खूप रडू आलं. जेव्हा सुमनदीनं फाटपं पान परत पुस्तकात शिवलं तेव्हाच ती रडायची थांबली.
माला अधूनमधून पुस्तकाला खेळायलाही घेऊन जायची. पाऊस आला की खेळ बंद व्हायचा. मग ती सगळ्यांना पुस्तकाच्या चित्रातली कोडी घालायची. वस्तीतल्या कुणाचकडे असं चित्राचं गोष्टीचं पुस्तक नव्हतं. सगळ्यांनाच ते फार आवडायचं. एका पावसात पुस्तक भिजलं तेव्हा मालाच्या आईनं ते गरम तव्यावर ठेवून वाळवलं.
असं मालाचं मस्त दोस्त असलेलं पुस्तक अचानक एके दिवशी गायब झालं. अन मग तिनं पुस्तकाच्या गोष्टींचं हे नवं पुस्तक लिहिलं.
शेवटचं वाक्य लिहून होतंय तोच आईचा आवाज आला, “माला…, जा का किताब रखवे की जगह है का?’’ पाठोपाठ दा म्हणाले, “जा रही तुमाइ किताब, हमरो के साथ बाजार घूमके आ गयी.’’ असं कसं झालं म्हणता? काय माहीत बुवा. पण मुद्दा हा की सध्या माला जाम खुश आहे कारण तिच्याकडे आता दोन पुस्तपं आहेत!
साभार – [email protected]


























































