त्रिवेंद्रमहून मस्कटला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. या विमानाने टेक ऑफ करताच विमानाच्या इंजिनमधून धूर निघाल्याने पायलटने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. या विमानात एकूण 142 प्रवासी होते. विमानाची तपासणी करण्यासाठी सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरवण्यात आले.