
सामना ऑनलाईन । अमेठी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 184 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे. अमेठीत कमळ फुलवून इतिहास घडवणार असल्याची प्रतिक्रिया इराणी यांनी अमेठीतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर टि्वटरवरून दिली आहे.
अमेठी का प्रतिनिधित्व करने का सम्मान मिला , अमेठी के कार्यकर्ताओं का प्यार मिला। अब कमल का फूल खिलाना है , नया इतिहास बनाना है https://t.co/o8NV0WXWZe
— Chowkidar Smriti Z Irani (@smritiirani) March 21, 2019
अमेठी मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवड झाल्याचा आनंद आहे. अमेठीत कमळ फुलवून इतिहास घडवण्याची जबाबदारी पक्षाने आपल्याकडे दिल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. अमेठी आता इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचेही त्या म्हणाल्या. तर हेमामालिनी यांना भाजपने मथुरेतून पुन्हा उमेदवारी दिली आहे. जनतेची इच्छा आहे की मी पुन्हा मथुरेतून निवडून यावे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांची आभारी आहे. या क्षेत्राचा विकास करण्याचे आश्वासनही हेमामालिनी यांनी दिले.
























































