मराठमोळ्या स्मृतीचा ‘विराट’ विक्रम; कोहली, गांगुलीला सोडले मागे

1494

हिंदुस्थानच्या महिला संघाने पाहुण्या वेस्ट इंडिज संघाचा एक दिवसीय मालिकेत धुव्वा उडवला. तिसऱ्या लढतीत टीम इंडियाने विंडीजला 6 विकेट्सने मात देत मालिका 2-1 अशी जिंकली. या मालिकेमध्ये मराठमोळी स्मृती मंधाना हिने दमदार कामगिरी केली. टीम इंडियाक़डून सर्वात कमी लढतीत 2000 धावांचा टप्पा गाठणारी मंधाना दुसरी खेळाडू ठरली. हा विक्रम सध्या शिखर धवन याच्या नावावर आहे. त्याने 48 डावांमध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला होता.

वन डे मालिकेतील पहिले दोन सामने खेळू न शकणाऱ्या स्मृती मंधानाने तिसऱ्या लढतीत मात्र धमाल कामगिरी साकारली. तिने अर्धशतकी खेळी तर साकारलीच शिवाय वन डे क्रिकेटमध्ये 2 हजार धावांचा पल्ला पार करणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा बहुमान मिळवला. ती असा पराक्रम करणारी पहिली हिंदुस्थानी आणि जगातील तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली. तिने 51 डावांत 2025 धावांची नोंद केली आहे. तिच्या सोबत ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क (41 डाव ) और मेग लेनिंग (45 डाव ) या तिघी महिला दोन हजारी क्लबच्या सदस्या आहेत.

मंधाना-जेमिमा जोडीची धमाल शतकी भागीदारी, विंडीजविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकली

विराट, गांगुलीला सोडले मागे
मंधानाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार सौरव गांगुली आणि नवज्योत सिद्धू यांचा विक्रम मोडला आहे. विराटने 53, गांगुलीने 52 आणि सिद्धूने 52 डावात 2000 धावा फटकावल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या