अलिबागमध्ये सापांचे पावणेदोन कोटींचे ‘विष’ जप्त, चार तस्करांना बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

सापाच्या विषाची तस्करी करण्यासाठी आलेल्या चौघांवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी झडप घातली आहे. टोळीकडून तब्बल पावणेदोन कोटींचे विष जप्त करण्यात आली असून या तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

राजाराम जैस्कार (46), उदयनाथ जैस्कार (37), देविलाल जोशी (36), संतोष कुमार सिंग (35) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता 29 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला खबऱ्याकडून सापाचे विष विकण्यासाठी दोनजण गुजरातमधून अलिबागमध्ये येणार असल्याची खबर लागली होती. त्यानुसार मांडका जेट्टीवर 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला होता. सायंकाळी मुंबई गेट वे येथून बोटीने राजाराम रामसोमरू जैस्कार व उदयनाथ रामजित जैस्कार हे मांडका येथे अलिबागमध्ये सापाचे विष विकण्यासाठी येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली.