सोनं अन् हिऱ्यांपासून बनवला साबण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात महागडा साबण कोणता या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. लेबनानच्या त्रिपोली येथे हा साबण बनवला जातो. विशेष म्हणजे या एका साबणाची किंमत तब्बल दोन लाख रुपये आहे. आता हा साबण इतका महाग का आहे असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. हा साबण बनवण्यासाठी चक्क सोनं अन् हिऱयांच्या पावडरचा वापर केला जातो. होय…तुम्ही बरोबर वाचलत. द खान अल सोप असे या साबणाची निर्मिती  करणाऱया ब्रॅण्डचे नाव आहे. या साबणाचे बहुतेक ग्राहक दुबईत आहेत. एका साबणात 17 ग्रॅम सोने अन् हिऱयांच्या पावडरीसोबत शुद्ध ऑलिव्ह ऑईल, सेंद्रिय मध, खजूर आदी गोष्टींचा वापर केला जातो.  त्यामुळे सहाजिकच या साबणासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात.