युवासेना प्रमुख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात सामाजिक उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पी/उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा, नगरसेविका संगीता सुतार यांच्याकडून मढ आयलंड येथील प्रेम सदन आश्रममध्ये फळे, भाजी, बिस्किट वाटप विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या हस्ते करण्यात आले.

दहिसरमध्ये शिवसेनेकडून मोफत पेट्रोल, डिझेलचे वाटप

इंधन दरवाढीने सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडल्याने सामान्य मुंबईकरांचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच रविवारी शिवसेनेने थेट पेट्रोल आणि डिझेलचे मोफत वाटप करीत मुंबईचे लक्ष वेधले. शिवसेना शाखा क्रमांक 1च्या वतीने  बोरिवली पश्चिमेकडील आय. सी. कॉलनी पेट्रोल पंप येथे  सकाळी वाहनचालकांना 1 लिटर पेट्रोल तसेच डिझेल मोफत देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्यासमवेत नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, उपविभाग संघटक शकुंतला शेलार, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा उपस्थित होते.

विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

शिवसेना विभाग क्रमांक 1मध्ये विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात रक्तदान शिबिरे, अन्नधान्य वाटप, छत्री वाटप, वृक्षारोपण, नगरसेवक निधीतून विविध सुशोभीकरण व उद्यानांचे लोकार्पण, विभागात रिक्षांना सुरक्षा पडद्यांचे वाटप इत्यादी कार्यकमांचा समावेश होता.

या सर्व कार्यक्रमांना आमदार प्रकाश सुर्वे, महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे यांनी भेट दिली. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व नगरसेवक, पुरुष व महिला पदाधिकारी, शाखाप्रमुख, शाखासंघटक यांनी परिश्रम घेतले.

शिव वाहतूक सेनेतर्फे विर्द्यार्थ्यांना 31 हजार वह्यांचे मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना विभागप्रमुख अॅड. अनिल परब यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विश्वनाथ महाडेश्वर, नीलेश भोसले, शिव वाहतूक सेनेचे माजी सरचिटणीस मोहन गोयल, सुभाष सावंत, विधानसभा समन्वयक मनोहर पांचाळ, विनय मोरे, मयूर पांचाळ, नरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई, भारतीय कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत व युवासेना विभाग अधिकारी प्रथमेश सकपाळ यांच्या पुढाकाराने ठाकूरद्वार चिराबाजार येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी रवींद्र मिर्लेकर, मीनाताई कांबळी, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ उपस्थित होते.

आमदार विभागप्रमुख संजय पोतनीस, आमदार मंगेश कुडाळकर, महिला विभागसंघटक संजना मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शाखासंघटक सोनाली स्वप्नील म्हात्रे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटपाचा शुभारंभ केला. यावेळी कुर्ला विधानसभा संघटक दिलीप शिंदे, विधानसभा समन्वयक बळीराम उतेकर आदी उपस्थित होते.