उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप अशा विविध उपक्रमांचे मुंबईसह राज्यभरात आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांचा या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

गोरेगाव पश्चिम आदर्श विद्यालय या शाळेतील पाचवी ते दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व शिक्षकांना छत्री वाटप करण्यात आले. विधानसभा समन्वयक दीपक सुर्वे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला माजी नगरसेवक, विधानसभा संघटक दिलीप शिंदे, उपविधानसभा समन्वयक अजय नाईक, मुख्याध्यापिका शोभने, उपविभाग संघटक कल्पिता तावडे, शाखा संघटक शोभना सकपाळ, डॉ. हेमचंद्र सामंत, कांता सावंत, समीर राजपूरकर आदी उपस्थित होते.

Displaying IMG-20250725-WA0026.jpg

शाखा क्र. 194 आणि 195च्या वतीने उपशाखा संघटक सोनल (शैलजा) पवार यांच्यावतीने एल्फिन्स्टन विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. हिंदवीर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार अजय चौधरी, उपनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सुधीर साळवी, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस अरुण तोरसकर, शाखाप्रमुख शैलेश माळी, युवासेना समन्वयक अभिषेक पाताडे उपस्थित होते.

Displaying IMG-20250725-WA0035 Darade.jpg

कुलाबा विधानसभा प्रमुख पल्लवी सकपाळ यांच्या वतीने कुलाबा विधानसभा मधील सर्व महिलांसाठी कर्करोग पूर्व तपासणी व मेमोग्राफी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी कामा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पालवे, विधानसभा संघटक युगंधरा साळेकर, दक्षिण मुंबई समन्वयक माई परब, युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ, पायल ठाकूर, विधानसभा संघटक विशाखा पेडणेकर, मेघा चौधरी, सरिता तांबट, बीना दौडकर, विजयश्री साखरे, माधुरी पेंढारी, अनिता सुलेगाई, लक्ष्मी सावंत, सुरेख हाडोळे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा 222 महिला आघाडीने विशेष परिश्रम घेतले.  

वडाळा विधानसभेतर्फे स्वच्छता मोहीम, रुग्णांना फळवाटप 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, विभाग संघटक श्रद्धा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वडाळा विधानसभेमध्ये विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य, शिबीर आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना शाखा क्र. 200 च्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम, शाखा क्र. 201 वतीने ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, शाखा क्र. 177 च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात रुग्णांसाठी फळवाटप करण्यात येणार आहे. तसेच वडाळा विधानसभा प्रमुख सुरेश कदम यांच्यावतीने वडाळा विधानसभा क्षेत्रातील कोकणात जाणाऱया गणेशभक्तांसाठी मोफत बस सेवा याशिवाय विविध मंदिरांत लाडू वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती सुरेश कदम, विधानसभा संघटक राकेश देशमुख, मुपुंद पडय़ाळ यांनी दिली.