
जगभरात टॅलेंटची कमी नाही. सोशल मीडियावरील पोस्ट, व्हिडियोंमधून याचा प्रत्यय येत असतो. वैष्णवी मोरे या डान्सर मुलीने अशीच जबरदस्त कमाल केली आहे. वैष्णवीने साडी नेसून ‘हुला हूप’ म्हणजेच ‘रिंग डान्स’ केला असून त्याचा व्हिडियो जोरदार व्हायरल होत आहे. त्यातील तिच्या हटके अंदाजातील हुला हूप आणि बेली डान्सचे कॉम्बिनेशन बघून नेटीजन्स थक्क झाले आहेत.
वैष्णवी मोरे हिचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. डान्सिंग डॉल अशी तिची ओळख आहे. वैष्णवी बऱयाचदा तिचे रिंग डान्सचे व्हिडियो शेअर करत असते. आताही तिने माधुरी दीक्षितच्या ‘बडी मुश्किल है’ या गाण्यावर साडी नेसून अफलातून डान्स व्हिडियो शेअर केला आहे. कमरेवर रिंग ठेवून आणि ती रिंग अत्यंत कौशल्याने गाण्याच्या ठेक्यानुसार फिरवून कधी डोक्यापर्यंत नेते, तर कधी हातात घेते. गाण्याच्या सूरांवर वैष्णवीच्या लाजवाब नृत्याचा ठेवा बघावयास मिळत आहे. आतापर्यंत 30 लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडियो बघून तिचे भरभरून कौतुक केले आहे.

























































