सामाजिक कार्यकर्ते सुभाष परब यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सामना प्रतिनिधी | मुंबई

ग्रँट रोड येथील जुनी चिखलवाडी येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते सुभाष परब यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. अत्यंत मनमिळाऊ, सुस्वभावी, माणुसकी जपणारे अशी त्यांची ओळख होती. राज्य परिवहन महामंडळातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेतला. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.