
मराठा समाजाच्या आंदोलनावर गोळीबार व लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बोरामणी येथील राष्ट्रीय महामार्गावर आज ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सरकारच्या विरोधात तीक्र घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात भारत कवडे, शाम भोसले, विकास भोसले, रतन शिंदे, बंडू मस्के, कमलाकर भोसले, पप्पू मस्के, सुनील नागणे, नाना भोसले, अमित मोर यांच्यासह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



























































