
सोलापूर महापालिकेच्या इमारतीचे फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. सोलापूर महापालिकेचे फायर ऑडिट झाले नाही आणि जी आग प्रतिबंधात्मक कोणत्याच उपाययोजना यशवंतराव चव्हाण सभागृह, हेरिटेज इंद्रभुवन वास्तू आणि प्रशासकीय इमारत या तीनही इमारतींमध्ये कार्यान्कित नसल्याचे उघड झाले आहे.
सोलापुरातील अगदी मध्यवर्ती प्रतिष्ठत भागातील 7 मजली इमारतीला आग लागली. सोलापूर शहरात रेल्वे लाइन्स भागात असलेल्या सातमजली इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे स्वरूप रौद्र होते. पार्किंगमधील अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहन तसेच येथील उत्सव मंडळाचे साहित्य, मेडिकल दुकानाचे साहित्य, इतर फर्निचर जळून खाक झाले आहे. आग आणि धुराचे लोट प्रचंड होते. इमारतीतील विद्युत पुरवठा खंडित झाला. वरच्या मजल्यावर राहणारे लोक गच्चीवर गेले. यात वृद्ध आणि मुलांचाही समावेश होता. धूर जिन्यामध्ये तसेच इमारतीतील प्रत्येक घरामध्ये साठला. या इमारतीत एकूण 48 प्लॅट आहेत, अशी माहिती मिळाली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या पाणीफवारणी करत होत्या, तरीही आग दोन तास आटोक्यात आली नाही. अग्निशमन अधीक्षक केदार आवटे स्वतः आग नियंत्रणामध्ये सहभागी झाले होते. अखेर जेसीबीला दर्शनी भाग फोडून पाणी फवारणी तसेच फोम फवारणी कराकी लागली. घटनास्थळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर तसेच पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे आणि पोलीस फोर्स काही केळातच पोहोचले. येथील नगरसेकक चेतन नरोटे, विनोद भोसले-शेजवाळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना इमारतीतून बाहेर काढण्यात मदत केली. स्वतः उपायुक्त बांगर आणि कडूकर यांनी गच्चीवर जाऊन तेथे थांबलेल्या वृद्ध आणि महिलांना सुरक्षित खाली आणण्यात मदत केली. घटनास्थळी पालिका आयुक्त पी. शिकशंकर, महापौर श्रीकांचना यन्नम यांनी भेट देऊन पाहणी केली असली, तरी या इमारतीचे फायर ऑडिट झाले नसल्याचे उघडकीस आले आहे.
शहरातील अनेक भागांत मोठ्या इमारतींचे बांधकाम होत असताना महापालिकेकडून अग्निशमन दलाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, पार्किंगसह कोणतेही नियमांचे पालन न करता अनेक बिल्डर, डेव्हलपर्स इमारतीचे बांधकाम बिनदिक्कतपणे करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेविषयी काळजी घेणे महत्त्वाचे असताना या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येते. खुद्द सोलापूर महापालिकाच याबाबत बेफिकिर असून, अग्निशमन दलाच्या वतीने अनेकवेळा महापालिका प्रशासनाला कळविण्यात आले असले तरी महापालिका इमारतीमध्ये अग्निशमन दलाची यंत्रणा कार्यान्वित नाही, असेच माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.

























































