
देवदर्शनाला चाललेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. समोरून येणारा कंटेनर कारवर पलटल्याने भीषण अपघाताची घटना अक्कलकोट-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी घडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुट्ट्या असल्याने कारमधील सर्वजण देवदर्शनासाठी चालले होते. तुळजापूरचे दर्शन घेतल्यानंतर भाविक दुपारच्या सुमारास अक्कलकोटला चालले होते. यावेळी अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गावाजवळ समोरून येणाऱ्या कंटनेर चालकाचा ताबा सुटला. यानंतर कंटेनर दोन वाहनांना धडक देत कारवर पलटला.
या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना सोलापुरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला.