स्वप्नात ‘या’ गोष्टी दिसल्यास मालामाल होण्याचे संकेत!

काहीजणांना स्वप्नात भविष्यात घडणाऱ्या काही घटनांबाबतचे संकेत मिळतात. स्वप्नात काहीजणांना भूतकाळात घडलेल्या घटनांचा उलगडा होतो. आपल्याला पडणारी स्वप्ने काहीतरी संकेत देत असतात, असे काहीजणांचे म्हणणे आहे. याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. मात्र, काही प्राचीन शास्त्रांनुसार आपली स्वप्ने भविष्याचे भाकिते वर्तवत असल्याचे सांगण्यात आले आहे. काहीजण त्यांच्या अंतर्ज्ञानाने किंवा मनाच्या शक्तीमुळे अशी गोष्टी जाणून घेऊ शकतात, असे या शास्त्रांमध्ये म्हटले आहे. आपल्या आयुष्यातील आर्थिक चणचण कधी दूर होणार असा प्रश्न अनेकांना पडतो. आर्थिक तंगी दूर होण्याचे संकेत काही स्वप्नांमधून मिळतात, असेही सांगण्यात येते. त्यामुळे अशी स्वप्ने आपल्याला पडावीत, असे सगळ्यांनाच वाटते.

स्वप्नात कोणत्याही देवतेचे दर्शन झाल्यास आयुष्यात मोठे यश मिळण्याचे ते संकेत आहेत. अनेक मोठ्या संधी मिळणार असून यशाची नवी शिखरे गाठण्याचे ते संकेत आहेत. स्वप्नात नृत्य करताना किंवा आनंदी तरुणी दिसल्यास असे स्वप्नही शुभ मानण्यात येते. लवकरच मालमाल होण्याचे ते संकेत असून अचानक धनलाभाचे भाकीत हे स्वप्न वर्तवते. स्वप्नात किंगफिशर म्हणजेच खंड्या पक्षी दिसणे म्हणजे आर्थिक तंगी दूर होण्याचे संकेत असतात. उंदीराला श्रीगणेशाचे वाहन मानण्यात येते. तसेच घरात उपद्रव देणारा म्हणून अनेकांना त्याची चीड असते. पण स्वप्नात उंदीर दिसल्यास नशीबाचे फासे तुमच्याबाजूने पडण्याचे ते संकेत असतात. त्यामुळे तिजोरीतील खडखडाट दूर होतो, अशी मानण्यात येते.

स्वप्नात पिवळ्या फूलांनी बहरलेला कंदब वृक्ष दिसणेही शुभ मानतात. हे स्वप्न आर्थिक स्थिती सुधारण्यासह आरोग्यात सुधारणा होण्याचे आणि मानसन्मान मिळण्याचे संकेत आहेत. स्वप्नात एखादा मृत पक्षी दिसल्यास घाबरून जाऊ नये, तुमच्या आयुष्यातील अडचणी संपण्याची ती चिन्हे आहेत, असे काही प्राचीन ग्रंथात नमूद करण्यात आले आहे. स्वप्नात मुंगुस दिसल्यास अचानक धनलाभाचे योग असल्याचे संकेत मिळतात. तसेच सोन्याचे आणि मौल्यवान रत्नांचे दागिने मिळण्याचे ते सूचक असल्याचे मानले जाते. स्वप्नात मधमाशी दिसल्यास डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी होणार असल्याचे ते संकेत आहेत. तसेच प्रकृतीत सुधारणा होण्याचेही ते संकेत आहेत. स्वप्नात आवळ्याचे किंवा कमळाचे फूल दिसल्यास काही दिवसातच हातात पैसे खुळखुळण्याचे संकेत असल्याचे मानले जाते. स्वप्नात कोणी आपल्याला सोन्याची अंगठी घालत असल्याचे दिसल्यास नातेवाईकांकडून मोठा धनलाभ होणार असल्याचे संकेत असल्याचे मानले जाते. स्वप्नात गाय दिसल्यास हातात पैसे येण्याचे संकेत असल्याचे मानण्यात येते. स्वप्नात हत्ती, घोडे दिसल्यास आर्थिक तंगी दूर होण्याचे ते संकेत असल्याचे मानले जाते. साप आणि विंचू यांची अनेकांना भीती वाटते. मात्र स्वप्नात साप किंवा विंचू दिसल्यास आर्थिक स्थिती आणखी मजबूत होणार असल्याचे ते संकेत मानण्यात येतात.

आपली प्रतिक्रिया द्या