ऑफिसचा ताण कमी करण्यासाठी या गोष्टी करा.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑफिसममधील कामाचे ताण तणाव,जीवघेणी स्पर्धा , राजकारण, एकमेकांवर कुरघोडी, या गोष्टी आजकाल फार सामान्य झाल्याआहेत. सामान्यतः असे दिसून येते की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा ताण खूप वाढतो तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या ऑफिस किंवा कामावरच नाही तर वैयक्तिक आयुष्यावरही दिसून येतो. ऑफिसचा ताण सर्वांनाच असतो.ऑफिसच्या तणावावर मात करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय अवलंबवून ताण कमी करू शकता.
1 तणावाचा शोध घेणे –
ऑफिसच्या ताणामुळे मानसिक पातळीवर खूप त्रास होत असेल, तर ऑफिसच्या ताणाचा मागोवा घ्या .डायरी लिहिण्याची सवय असल्यास फक्त विचार डायरीत लिहू नका, तर तणावाखाली असाल तेव्हा तणावाची परिस्थिती लिहिण्याचा प्रयत्न करा. यामुळे स्वत:ची तपासणी करण्याची संधी मिळते, ज्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करायला सोपे होते.
2तणाव कमी करण्यासाठी अरबट चरबट खाऊ नका –
तणाव कमी करण्यासाठी लोक मिठाई, तळलेले पदार्थ, फास्ट फूड किंवा मादक पदार्थांचे सेवन करतात. परंतु आपण निरोगी पर्याय निवडणे चांगले आहे. दररोज नियमित व्यायाम करा. हा एक उत्तम तणावमुक्तीचा मार्ग आहे. याशिवाय, योग, संगीत ऐकणे, मैदानी खेळ खेळणे, चालायला जाणे एखादा छंद जोपासणे इ. विविध मार्गांनी तणाव कमी होऊ शकतो.
3 काम आणि वैयक्तिक जीवन यात सुवर्णमध्य साधा –
बहुतेक लोक त्यांच्या कामात इतके व्यस्त असतात की त्यांचे वैयक्तिक जीवन विस्कळीत होऊ लागते आणि तणाव वाढू लागतो. कोणत्याही परिस्थितीत घरच्यांचा पाठींबा खूप महत्वाचा असतो. यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सीमारेषा ठरवणे कधीही चांगले.
4 थोडा आराम करा –
अतिरिक्त ताण दूर करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे घरी राहून आराम करणे. या मार्ग अवश्य अवलंब करा. घरातील माणसांबरोबर वेळ घालवा. मुलांना वेळ द्या. घरात पाळीव प्राणी असतील तर त्यांच्याबरोबर जरूर वेळ घालवा.
मेडीटेशन करा – दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम केल्याने मानसिकदृष्ट्या अधिक शांतता आणि आनंदी वाटेल. तसेच त्याचा सकारात्मक परिणाम कामावरही दिसून येईल.