नैराश्याने ग्रासलेला BARC च्या वैज्ञानिकाचा मुलगा बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील भाभा अणुउर्जा संशोधन केंद्रातील वैज्ञानिकाचा मुलगा बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. नमन दत्त असं या मुलाचं नाव असून तो १७ वर्षांचा आहे. २३ सप्टेंबरपासून तो बेपत्ता झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांच्या शोधात त्यांना फार यश मिळालेलं नाहीये, ज्यामुळे नमनचे कुटुंबीय चिंतेत आहेत.

>२३ सप्टेंबरला नमन रात्री १०.३० घराबाहेर पडला होता, त्यानंतर त्याने रात्री १ वाजता मुंबईला जाणारी ट्रेन पकडली होती. त्यानंतर तो कुठे गेला हे कळू शकलेलं नाही. पोलिसांनी नमनचा कॉल रेकॉर्ड तपासून पाहायला सुरूवात केली आहे, तसेच तो ज्या मार्गाने प्रवास करत होता, त्या सगळ्या स्टेशनचे सीसीटीव्ही तपासायलाही सुरुवात केली आहे.

नमन हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. त्याची आई चंद्रा राममुर्ती यांनी सांगितलं की तो नैराश्यातून बाहेर येण्यासाठी इलाज देखील घेत होता. घरातल्या एका व्यक्तीच्या निधनामुळे त्याला जबरदस्त धक्का बसला होता असं चंद्रा यांनी सांगितलं आहे