सोनई तिहेरी हत्याकांड – पाच आरोपींच्या फाशीची शिक्षा कायम, एक निर्दोष

1450

नगर जिल्ह्यातील सोनई येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील सहापैकी पाच आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे, तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. पुराव्यांअभावी हत्याकांडातील दुसरा आरोपी अशोक नवगिरे याची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

2013 मध्ये नगर जिल्ह्यातील सोनई या गावामध्ये तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. प्रेमप्रकरणातून धुळे जिल्ह्यातील तीन दलित मजुरांची हत्या करून त्यांच्या मृतदेहांचे तुकडे करून सेफ्टिक टँकमध्ये टाकण्यात आले होते. या हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी अटक केलेल्या सहा आरोपींना 2018 मध्ये नाशिकच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला दोषी आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.

सोमवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या प्रकरणात न्यायालयाने आरोपी प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले आणि संदीप कुऱ्हे या पाचजणांची फाशीची शिक्षा कायम ठेवली, तर अशोक नवगिरे याची पुराव्याअभावी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या