3500 टन नाही केवळ 160 किलो सोने सापडले

2144

उत्तर प्रदेशात सोनभद्र जिल्हय़ात सोन्याच्या दोन खाणी सापडल्या. तब्बल 3500 टन सोने सापडले असे वृत्त सर्वत्र झळकले. पण अवघ्या 24 तासांत हे वृत्त निराधार असल्याचे जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (जीएसआय) स्पष्ट केले आहे. सोन्याची खाण नाही. 3500 टन नाही, तर केवळ 160 किलो सोने सापडल्याचे म्हटले आहे. सोनभद्र जिल्हय़ात गेली 20 वर्षांपासून उत्खनन सुरू आहे. जीएसआय आणि उत्तरप्रदेश भूगर्भशास्त्र्ा व खाण संचलनालय यांना सोनपहाडी गावातील खाणीत 2943 टन सोन आणि हर्डी येथील खाणीत 646 किलो असे एकूण 3589 टन सोने सापडल्याचे सोनभद्र जिल्हय़ाचे मायनिंग अधिकारी के. के. राय यांनी शुक्रवारी सांगितले होते. या वृत्ताने देशभरात आनंदाचे वातावरण होते.  पण अवघ्या 24 तासांत हे वृत्तच निराधार असल्याचे जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे उत्तर विभागाचे महासंचालक एम. श्रीधर यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या