
दक्षिण कोरियातील एका न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. योल यांनी 2024 मध्ये पदावर असताना देशभरात मार्शल लॉ लागू करण्याचा प्रयत्न केला होता. न्यायालयाने याला सत्तेचा गैरवापर म्हणत त्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. योल यांनी देशाला राजकीय संकटात ढकलले होते. यून यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःला आपल्या घरात बंद करून घेतले होते. न्यायालयात त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करणाऱयांनी यूनला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आता न्यायालय या प्रकरणावर फेब्रुवारीमध्ये पुढील निर्णय देईल.



























































