दक्षिण मुंबईकरांची तहान टँकरच्या पाण्यावर – अमिन पटेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या आपण चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची योजना आखत आहोत; पण दक्षिण मुंबईच्या अनेक भागात संपूर्ण दिवसात फक्त दहा मिनिटे पाणीपुरवठा होत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे दक्षिण मुंबईकरांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या भागातील पाणी पुरवठय़ात वाढ करण्याची मागणी काँग्रेस सदस्य अमिन पटेल यांनी आज विधानसभेत केली.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना त्यांनी पुलाबा, नागपाडा भायखळा, मुंबादेवी, मलबार हिलमधील पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली. सध्या या भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. मुंबईची 2047 मधील लोकसंख्या लक्षात घेतली तर आपल्याला 6 हजार 600 दशलक्ष लिटर्सहून अधिक पाण्याची गरज लागेल. भविष्यतील पाण्याची गरज लक्षात घेता समुद्राचे खारे पाणी गोडे करणाऱया प्रकल्पाची गरज असल्याचे मत अमिन पटेल यांनी व्यक्त केले.