
सामना ऑनलाईन, लखनऊ
उत्तर प्रदेश विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज म्हणजेच मंगळवारी सुरूवात झाली. राज्यपाल राम नाईक यांचे आज अभिभाषण होते. या अभिभाषणादरम्यान समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी तुफान गोंधळ घातला. गोंधळादरम्यान त्यांनी राज्यपाल राम नाईक यांना कागदाचे बोळे फेकून मारले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची निंदा केली आहे.
UP CM Yogi Adityanath on ruckus in UP Assembly: The way slogans were raised against the Governor & SP members threw paper balls at him is condemnable. We criticise how SP&BSP members behaved in front of the Governor. Now you can imagine what kind of system these people want. pic.twitter.com/yPNGyq9sQa
— ANI UP (@ANINewsUP) February 5, 2019
राज्यपालांचे अभिभाषण संपल्यानंतर सपा आणि बसपचे सगळे आमदार वेलमध्ये उतरले आणि बॅनर हातात घेत घोषणाबाजी करायला लागले. वेलमध्ये काय सुरू आहे हे पाहण्यासाठी राज्यपाल राम नाईक उभे होते. यावेळी त्यांच्यावर बोळे फेकण्यात आले. हा गोंधळ सुरू असताना सपाचे सुभाष पासी नावाचे आमदार बेशुद्ध झाले.त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
























































