नीरव मोदीच्या प्रत्यार्पण प्रक्रियेला विशेष न्यायालयाची परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पंजाब नॅशनल बँकेतील साडेतेरा हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याच्या विरुद्धच्या प्रत्यार्पण प्रक्रियेला मुंबईतील विशेष न्यायालयाने आज मंजुरी दिली. विशेष न्यायाधीश एम.एस. आझमी यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अर्जावर निर्णय देताना नीरव मोदीविरुद्ध प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली. दरम्यान, न्यायालयाच्या आजच्या आदेशाची प्रत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल, अशी माहिती ‘ईडी’चे वकील हितेन वेणेगावकर यांनी दिली.