Special Parliament Session – संसदेच्या विशेष अधिवेशनाची गोंधळाने सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या विशेष अधिवेशनाची सुरुवात गोंधळाने झाली. अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी आक्रमक होत घोषणाबाजी सुरू केली. तांत्रिक चूक दाखवत विरोधकांनी गदारोळ केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले.

संसदेचे हे विशेष अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पहिल्या दिवसाचे कामकाज संसदेच्या जुन्या इमारतीमध्ये, तर चार दिवसांचे कामकाज संसदेच्या नव्या इमारतीमध्ये होणार आहे. हे अधिवेशन सुरू होण्याआधी संसदेबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्र छोटं आहे परंतु वेळेच्या हिशोबाने मोठे निर्णय होणार आहेत, असे मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान, विशेष अधिवेशनात आठ विधेयके सादर होणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठक पार पडली. महिला आरक्षण विधेयकही याच अधिवेशनात मंजूर केले जावे, अशी आग्रही मागणी या बैठकीमध्ये विरोधी पक्षांनी केली.

विशेष अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांना अधिवेशनातील कामकाजाचा तपशील देण्यात आला. महिला आरक्षण विधेयक याच अधिवेशनात पारित करण्यात यावे अशी विरोधकांनी मागणी केल्याची माहिती काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी दिली. पाच दिवसांच्या या अधिवेशनामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसंदर्भातील विधेयकाचाही समावेश आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, सेवेच्या अटी आणि पदाची मुदत यासंदर्भातील विधेयक 10 ऑगस्ट रोजी राज्यसभेमध्ये मांडण्यात आले होते. त्या विधेयकावर विशेष अधिवेशनात राज्यसभेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

या अधिवेशनात पुढील विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे

  • रद्द करणे आणि सुधारणा विधेयक
  • पोस्ट ऑफिस बिल, 2023
  • वकील (दुरुस्ती) विधेयक, 2023.
  • नियतकालिकांचे प्रेस आणि नोंदणी विधेयक, 2023
  • ज्येष्ठ नागरिक कल्याण विधेयक, 2023
  • संविधान (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती) आदेश, 2023
  • संविधान (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती) आदेश, 2023
  • संविधान (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती) आदेश, 2023