
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख- आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंधेरीत भव्य रोजगार मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. डी. एन. नगर येथील सी. एस. सावंत सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला शेकडो तरुणांनी हजेरी लावली. शिवसेना नेते अनिल परब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. माजी विभाग अधिकारी रमेश वांजळे यांच्या वतीने तसेच शिवसेना 165 अंधेरी पश्चिम विधानसभा आणि जीवनमित्र फाऊंडेशनने याचे आयोजन केले होते.
रोजगार मेळाव्यात बँकिग, वित्त, विमा यांच्यासह इतर क्षेत्रातील अनेक पंपन्या उपस्थित होत्या. या रोजगार मेळाव्याला विधानसभा क्षेत्रातील शेकडो बेरोजगार युवक-युवतींनी उपस्थिती लावली. मेळाव्यात काही उमेदवारांना तत्काळ नोकरी देण्यात आली. यामुळे अनेक युवकांनी आयोजकांचे आभार मानले. रोजगार मेळाव्याबरोबरच पावसाळय़ात व नैसर्गिक आपत्तीमध्ये स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांना मदत करणाऱया व्यक्तींना देण्यासाठी ‘भगवा रक्षक’ या टी शर्टचे अनावरण शिवसेना नेते अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले तसेच त्यांनी युवक-युवतींना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, विधानसभा संघटक संजय मानाजी कदम, वीणा टॉक, सहसंघटिका ज्योत्स्ना दिघे, समन्वयक सुनील खाबिया जैन, सहसमन्वयक भावना मांगेला, उपविभागप्रमुख शरद जाधव, प्रतिभा पाटील, रंजना पाटील, संजीवनी घोसाळकर, माथाडी सेनेचे विधानसभा अध्यक्ष राजेश नारकर, शाखाप्रमुख दीपक सणस, स्वाती तावडे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.