
श्रीलंका नौदलाने 35 हिंदुस्थानी मच्छीमारांना अटक केली आहे. तसेच चार बोटीसुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. जाफना जिह्यातील कांकेसंथुराई क्षेत्रात ही अटक करण्यात आली आहे. हिंदुस्थानी मच्छीमार अवैधपणे या ठिकाणी मासेमारी करत होते, असे श्रीलंकेच्या नौदलाने म्हटले आहे. श्रीलंका नौदलाकडून एका महिन्यात ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे. याआधी 47 हिंदुस्थानी मच्छीमारांना अटक केली होती. तसेच त्यांच्या पाच बोटीही जप्त करण्यात आल्या होत्या.





























































