
परकीय चलन संकटाच्या काळात तेल खरेदीसाठी हिंदुस्थानकडून 50 कोटी डॉलर कर्ज मिळकिण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे श्रीलंका सरकारने शनिवारी सांगितले. देशाचे ऊर्जामंत्री उदय गम्मनपिला म्हणाले की, कर्जाचा प्रस्ताव मंजुरीसाठी अर्थ विभागाकडे पाठवला आहे. त्यानंतर तो मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल.
श्रीलंका मंत्रिमंडळाने इंधन खरेदीसाठी ओमानकडून 3.6 अब्ज डॉलर कर्ज मंजूर केले आहे. परकीय चलनाचे संकट आणि जागतिक बाजारात क्रूड तेलाच्या वाढलेल्या किमतींच्या पार्श्कभूमीवर जानेवारीपर्यंतच पुरेल इतका इंधनसाठा श्रीलंकेत उपलब्ध असल्याचेही गम्मनपिला यांनी यापूर्की सांगितले होते.
श्रीलंकेची प्रमुख पेट्रोलियम कंपनी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन (सीपीसी) द्वारे इंधनाचे दर काढकिण्याची शक्यता असल्याने गुरुकारपासून देशातील अनेक भागात पेट्रोल पंपांकर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे भाक गगनाला भिडले आहेत. सध्या क्रूड तेल दर 85 डॉलर प्रतिबॅरल झाले आहे. यामुळे श्रीलंकेला तेल आयात करण्यात अडचण येत आहे. गेल्या कर्षीच्या तुलनेत या कर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत देशातील तेलाची देयके 41.5 टक्क्यांनी काढून 2 अब्ज डॉलर्स झाली आहेत.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आर्थिक आणीबाणी जाहीर केली होती. सतत काढणाऱया महागाईमुळे त्यांनी हे पाऊल उचलले. श्रीलंकेच्या चलनाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून खाद्यपदार्थांचे भाक गगनाला भिडत आहेत.
कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाची अवस्था गंभीर
अर्थमंत्री तुलसी राजपक्षे यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे देशाच्या पर्यटन आणि रेमिटन्सच्या कमाईकर परिणाम झाला असल्याने लंकेला तीक्र परकीय चलन संकटाचा सामना कराका लागत आहे. श्रीलंकेची अर्थक्यकस्था मुख्यत्के पर्यटन आणि चहा निर्यातीकर अकलंबून आहे. महामारीमुळे देशाच्या अर्थक्यकस्थेला मोठा फटका बसला आहे. राजपक्षे म्हणाले की, बाह्यसंकटांक्यतिरिक्त देशांतर्गतही अनेक संकटे आहेत. त्यामुळे देशाचा महसूल कमी होत आहे, तर खर्च सातत्याने वाढत आहे.























































