श्रीलंका नॉनस्टॉप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड कप पात्रता फेरीत श्रीलंकेने साखळीप्रमाणे सुपरसिक्समध्येही नॉनस्टॉप विजय मिळवत षटकार ठोकला. आजही त्यांनी सुपरसिक्सच्या अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडीजचा 34 चेंडू आणि 6 विकेट राखत सहज विजय मिळविला. आता रविवारी त्यांची अंतिम लढत नेदरलॅण्ड्सशी रंगेल.

स्पर्धेतून आधीच बाद झालेल्या वेस्ट इंडीजला आपला शेवटही सुखद करता आला नाही. महीश तिक्षणाने 34 धावांत 4 विकेट टिपल्याने वेस्ट इंडीजचा संघ 48.1 षटकांत 243 धावांवरच आटोपला. या डावात किसी कार्टीने 87 धावांची एकमेव दमदार खेळी साकारली. त्यानंतर 244 धावांचा पाठलाग करताना पथुम निस्सांकाने 104 धावांची खेळी करताना दिमुथ करुणारत्नेबरोबर 190 धावांची सलामी देत सामना एकतर्फी केला. करुणारत्नेने 83 धावा केल्या.