
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे यांची बदली अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) आयुक्तपदी करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी डुबे यांच्यासह चार सनदी अधिकाऱयांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या चारपैकी तीन अधिकाऱयांची अलीकडेच भारतीय प्रशासकीय सेवा संवर्गात निवड झाली आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांची नेमणूक दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे म्हणून करण्यात आली आहे. महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांची मुंबईत शहरी आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. तर मंत्रालयात गृह विभागाचे सहसचिव असणारे राहुल कुलकर्णी यांची बदली महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.




























































