डॉ. श्रीराम लागू अनंतात विलीन, वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ रंगकर्मी, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मराठी रंगभूमीच्या या नटसम्राटाचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली.

डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. 19) रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते परंतु त्यांचा मुलगा डॉ. आनंद लागू त्या दिवशी अमेरिकेहून पुण्यात पोहचू शकत नसल्यामुळे शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारामध्ये त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी काही वेळ ठेवण्यात आले होते. त्यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, नाटक, चित्रपट, राजकीय आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

वैकुंठ समशानभूमीत पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडल्या. पोलिसांच्या बॅण्ड पथकाने कादनातून डॉ. लागू यांना मानकंदना दिली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. लागू यांच्या पार्थिकाकरील तिरंगा ध्वज लागू कुटुंबीयांना सुपूर्द केला. शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुभाष देसाई, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, पोलीस आयुक्त व्यंकटेशम्, महापौर मुरलीधर माहोळ, खासदार गिरीश बापट, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली.

सुभाष देसाई यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन
शिवसेना नेते, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुभाष देसाई यांनी वैकुंठ स्मशानभूमी येथे डॉ. श्रीराम लागू यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दीपा लागू, डॉ. आनंद लागू, शुभांगी कानिटकर, गौरी लागू, प्रसाद लागू, डॉ. श्रीरंग कानेटकर आदींचे सांत्वन केले.